दिग्दर्शक डॉ.एस के दास यांच्या 'सनी' या लघुपटाला चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार मिळाला

Apr 27, 2022 - 09:10
 0
दिग्दर्शक डॉ.एस के दास यांच्या 'सनी' या लघुपटाला चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार मिळाला

11 व्या 'सीएमसी वटावरन सीएमसी वटावरन फिल्म फेस्टिवल एंड अवार्ड्स' मध्ये'सनी' या लघुपटासाठी 'लाइव्हलीहुड अँड सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज' श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार

 'सोशल इमेज प्रोडक्शन' या बॅनरखाली निर्मित आणि डॉ. एस के दास दिग्दर्शित "सनी - द सन ऑफ रिव्हर महानदी" या लघुपटाला '11व्या सीएमसी वटावरन सीएमसी वटावरन फिल्म फेस्टिवल एंड अवार्ड्स' मध्ये 23 एप्रिल 2022 रोजी चंदीगड येथे 'लाइव्हलीहुड अँड सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज' श्रेणीतील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वर्षी एकूण 21 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांना 10 श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, डॉ. जी. बी. के. राव, महोत्सवाचे दिग्दर्शक इत्यादी अनेक दिग्गजांनी याचे परीक्षण केले. एस के दास यांना 50,000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. त्याबद्दल त्यांनी अवॉर्ड समिती आणि ज्युरीच्या सर्व लोकांचे आभार मानले.

 डॉ. स्वेता कुमार दास (एस के दास) यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून एमए, एम.फिल आणि पीएचडी पूर्ण केल्यानंतर ओडिशा प्रशासकीय सेवेत करिअर केले. महिला सक्षमीकरण, शेतकरी आत्महत्या, जातिव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि सध्याची सामाजिक अंधश्रद्धा अशा सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट बनवण्यात त्यांना विशेष रस आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मास्क' या लघुपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

 दिग्दर्शक डॉ. एस के दास म्हणतात,"सनी हा लघुपट महानदी नदी आणि ओडिशातील मच्छिमारांच्या उपजीविकेवर आधारित आहे. हा चित्रपट ओडिया भाषेत बनवला आहे.महानदी ही ओडिशाची जननी मानली जाते, ही नदी लोकांच्या उपजीविकेशी घट्ट जोडलेली आहे. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की,दोन राज्यांमधील पाण्याच्या वादात मच्छिमार समाजाला कसा सामना करावा लागतो?"